Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
सामर्थ्य आहे केशायुर्वेद चळवळीचे : डॉ. सारिका बावस्कर

सामर्थ्य आहे केशायुर्वेद चळवळीचे : डॉ. सारिका बावस्कर
एका सामान्य मध्यमवर्गीय कुटूंबात माझा जन्म झाला. वाळूंजच्या एमआयडीसीच्या कामगार वसाहत आणि औद्योगिक वसाहतीत 1998 साली वैद्यकीय सेवेला सुरवात केली. सुरवातीपासूनच जनरल प्रॅक्टीस आणि आयुर्वेद असे दोन्ही प्रकारचे पेशंट हाताळले. दोन्ही प्रकारच्या पेशंटचे वेगळे वर्ग हळूहळू तयार झाले.
त्वचा आणि केसविकारांविषयी ठाण्यातील डॉ. दिलीप ठक्कर यांच्यांकडे शिकल्यामुळे विशेष आवड निर्माण झाली आणि प्राविण्यही आले. त्यानंतर प्रॅक्टीसचे अपग्रेडेशन करण्याचा विचार मनात होता. परंतु योग्य पर्यायाच्या शोधात होते. त्यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी हा कोर्स केला. त्यात पहिल्याच लेक्चरमध्ये वैद्य हरिश पाटणकरांची भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व शंका दूर झाल्या आणि केशायुर्वेदशीही जोडले गेले. केशायुर्वेदमुळे स्थानिक परिसर, समाज आणि वैद्यकीय वर्तुळात विशेष स्थान, मान प्राप्त झाला. महत्त्वाचे म्हणजे शास्त्रानुसार अधिक योग्य व बिनचूक उपचार आणि यशप्राप्तीचे समाधान लाभले, जे पैशात मोजणे केवळ अशक्य आहे. आपल्या उपचारांनी बर्या झालेल्या पेशंटच्या शिफारशीने जेव्हा दुसरा पेशंट आपल्याकडे येतो, तेव्हा त्याचे समाधान काही औरच असते.
बाहेर सहा-सात वर्ष ट्रीटमेंट घेतलेल्या पेशंटचंही स्काल्प अॅनालिसिस वगैरे केलेले नव्हते. टॉर्चने स्काल्प बघायची आणि तीच तीच औषधे द्यायची, अशी ट्रीटमेंट सुरू होती, असे हे पेशंट सांगायचे. वात-पित्त-कफानुसार औषधोपचार दिल्यामुळे काही महिला पेशंटच्या त्वचा, मासिक पाळीच्या समस्याही दूर झाल्या. 70-75 वर्षांच्या आजीबाईंना केसांची समस्या होती. त्यांना एक्स्टर्नल ट्रीटमेंटनेच फार फरक पडला. तेव्हा त्यांचे नातेवाईक त्यांना घेऊन आले आणि त्यांनी माझे आभार मानले. केशायुर्वेदमुळे असे समाधानाचे प्रसंगही अनेक पदरात पडले.
जुलै 2017 मध्ये केशायुर्वेद या विषयावर वैद्य पाटणकरांचे स्वतंत्र मार्गदर्शन घेतले व त्यानुसार काम सुरू केले. याची सगळी मांडणी, रूपरेषा, व्यवहार पारदर्शक आहे. त्यामुळे (वयाने लहान असूनही) आम्ही त्यांना आणि स्नेहल मॅडमना आमचे आयुर्वेद गुरू मानतो. काही व्यक्तींची भेट झाल्यावर इतर गोष्टी (उदा. वय वगैरे) आपसूक विसरतात आणि शास्त्र-आयुर्वेदाच्या सेवेचे बळ मिळते हे विशेष.
केशायुर्वेदची अनेक बलस्थाने आहेत. 1) फी व्यतिरिक्त इतर कोणतीही गुंतवणूक नाही आणि कसलेही टार्गेट नाही. 2) वैद्याचे वैद्यत्व जपून त्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले जाते. 3) वेळोवेळी (24 तास) मार्गदर्शनाची उपलब्धता. 4) अधिकाधिक वैज्ञानिक व शास्त्रशुद्ध माहिती. 5) 100 चौरस फूट जागाही पुरेशी आहे. कोणतीही विशेष अट नाही. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडिया सजगपणे आणि सकारात्मकतेने कसा वापरावा हे मी केशायुर्वेद परिवारात सामील झाल्यानंतर नव्याने शिकलो.
आधी आमचे क्लिनीक फक्त 200 चौरस फुटांचे होते. अलीकडेच आम्ही 2000 चौरस फुटांच्या नव्या वास्तूत स्थलांतरीत झालो आहोत. व्यवसायाच्या संदर्भातला हा विश्वास वैद्य पाटणकरांनी दिलेल्या शिकवणुकीतून निर्माण झाला. भालेराव सरांच्या मदतीने सध्याचे हॉस्पिटल एनएबीएच अॅक्रिडेटेड कॅशलेस इन्शुरन्स आयुर्वेदिक हॉस्पिटल करण्याच्या प्रयत्नात आहे. सर्व फ्रँचायजीधारकांनाही माझी सूचना आहे, की त्यांनीही हा बदल करून घ्यावा आणि परदेशातील रुग्णांनाही आकर्षित करून सेवा द्यावी व आयुर्वेदाचा प्रसार करावा.
सर्वांत सुंदर म्हणजे सर्वच्या सर्व 108 सेंटर विश्वास आणि निर्भयतेने पेशंटला हव्या असलेल्या लोकेशनच्या सेंटरकडे रेफर करतात. तसेच सर्वजण मिळून निःशुल्क सल्ल्याचे आदानप्रदान करतात. माझा पेशंट दुसर्या डॉक्टरकडे गेला, तर काय होईल, ही भीतीच मुळात पाटणकरांनी घालवली. वेबिनारमुळे पाटणकर यांच्यासह इतर तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते आणि नवा दृष्टीकोन विकसित होतो. परिसरातील समतुल्य, उच्चशिक्षित तज्ज्ञही केसांसाठी विश्वासाने स्वतः येतात. प्रसंगी इतर रुग्ण वा नातेवाईकांना रेफर करतात. तेव्हा फार छान वाटते. याचे सर्व श्रेय केशायुर्वेदलाच आहे. एक सूचना करावीशी वाटते, ती अशी की अजूनही सिस्टिम अॅप्लिकेशन्स, स्काल्प अॅनालायजर युजर फ्रेंडली होण्याची गरज आहे. या सुविधा मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करता येईल, इतक्या सुलभ होणे गरजेचे आहे. तसेच केवळ सॅम्पल बेस्ड टॉप रँकिंग किंवा क्रेडिट सिस्टिममध्ये बदल व्हावा.
केशायुर्वेदमुळे औषधनिर्माण शिकून त्यातून पेशंटला अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व पूरक औषधी उपलब्ध झाली. अधिकाधिक प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे अनेक सकारात्मक अनुभवांनी प्रॅक्टीस समृद्ध झाली. व्यवसायवृद्धी तर झालीच. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे। जोजो करील तयाचे। तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥’ या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. भगवंत म्हणजे प्रामाणिकपणा, शास्त्राधार, प्रयत्नांची शिकस्त आणि आध्यात्मिक पाठबळ होय. प्रॅक्टीस तेव्हाही होती आणि आज फ्रँचायजी घेतल्यानंतरही आहे. पण आता माझे पेशंट कुठेच जात नाहीत. कन्सल्टंटच्या लेव्हलची प्रॅक्टीस सुरू झाली आहे. जनरल प्रॅक्टीस करताना पेशंट दुसर्या डॉक्टरकडे जाण्याची भीती असायची. पेशंट क्लिनीकमध्ये येऊन बसायचे. डॉक्टर नसेल तर दुसर्या डॉक्टरकडे जायचे. पण आता गंगापूर, इतर छोट्या वाड्यांतून पेशंट खास अपॉईंटमेंट घेऊन येतात. आपण नसलो तर काही दिवस आधी किंवा नंतर येऊन औषधे घेऊन जातात. अर्थात खुर्चीत बसून आपण आता जास्त फी घेतोय, असे वाटत नाही. कारण त्या पेशंटलाही रिझल्ट मिळतोय. ते स्वतः समाधानी आहेतच; पण ते इतरांनाही सांगतात याचे कौतुक वाटते. आकड्यांना महत्त्व नाही पण पेशंट चिटकून राहू लागलेत, एक प्रकारची लॉयल्टी निर्माण झाली आहे हे नक्की.
अहमदाबादला झालेल्या जागतिक आयुर्वेद परिषदेत ‘स्कीन फंगल इन्फेक्शन्स’वर आम्ही पोस्टर केले होते. वैद्य पाटणकरांनी दिलेल्या संधीमुळेच हे शक्य झाले. आमची प्रॅक्टीस आमच्या पेशंटपुरती मर्यादित होती. बाहेरच्या जगात काय चालले आहे, हे जाणून घेत नव्हतो. पण आयुर्वेदाकडे वळल्यापासून जगात काय चालले आहे आणि आपण काय करू शकतो, परदेशातही काय संधी आहेत, हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून चांगले कळायला लागले. केशायुर्वेदचे संतुष्ट पेशंट आणि त्यांचा पारदर्शकपणे संरक्षित केलेला ऑनलाइन डाटा हेच केशायुर्वेदचे खरे ब्रँड अॅम्बॅसिडर आहेत. केशायुर्वेद हे प्रचंड (अगदी अणुबॉम्बएवढी) क्षमता असलेले बीज आहे, ते अंकुरत आहे, त्याचा वटवृक्ष होत आहे. तो ‘वाढता वाढता भेदले अणुमंडला’ (भौगोलिक सीमांच्या पलीकडे) अशा पद्धतीने व्यापक होणार यात संदेह नाही.दृष्टिक्षेपात डॉ. सारिका बावस्कर